Arun.V.Deshpande - "सुहाना सफर - गीतोंका का ...!१९५०-१९६५ ..
Thursday, February 3, 2022
फिल्म संगीत - -टोकीज - रेडीओ , रेकोर्ड, टिव्ही..वगेरे
फिल्म संगीत
टॉकीज,रेडिओ ,रेकॉर्ड ,टीव्ही, वगैरे...
---------------------------
रसिक हो नमस्कार..
बोलपट झाल्यावर " हिंदी फिल्म आणि संगीत
यांचा प्रवास "रेडिओ, रेकॉर्ड प्लेयर, टॉकीज,
व्हीडिओ, टीव्ही, आणि आता अत्याधुनिक
इंटरनेट असा झाला आहे..
मित्र हो .. "मै खुश नसीब हूं ..या फिल्मी प्रवासाचा मी हमसफर" आहे..
आयुष्य प्रवासातील सत्तरीच्या वळणावर सफर", करणारा मी एक साधा -"आदमी" आहे.
ज्याचे सगळे आयुष्य या हिंदी फिल्म्सनी, त्यातील कलाकार, गायक-गायिका,
गीतकार, संगीतकार आणि इतर अनेक गोष्टींनी पुरते झपाटून टाकले आहे.
"या पृथ्वीतलावरील माणसांचे अवघे भावविश्व
या फिल्म्सनी आणि त्यातील गाण्यांनी व्यापून टाकले आहे.जनसामान्यांच्या आयुष्यात याचे अनन्य साधारण असे भावनिक महत्व आहे.
असे म्हणावेसे वाटते.
मी देखील यायलाच एक फिल्म वेडा, हिंदी फिल्म संगीताचा "कानसेन" आहे, ज्याच्या
मनावर के.एल.सैगल नावाच्या "तानसेन"च्या
आवाजाचे गारुड आहे.
मित्र हो..
हिंदी फिल्म आणि हिंदी फिल्म संगीत पर्व "म्हणजेच "गोल्डन ईरा" 1950 पासून आहे असे मानले जाते.
मी याच "सुवर्ण काळात जन्मलो हा खरेच
म्युझिकल सुवर्णयोग आहे कारण
माझा जन्म झाला ते वर्ष आहे 1951".
मित्र हो, या जगात माझा प्रवेश झाला, त्या
क्षणापासून, त्या पहिल्या दिवसापासून
" हिंदी फिल्मी गीत आणि संगीत ,माझ्या
कानावर पडून थेट "दिल" के पास पोंचले
आहे.
हिंदी फिल्म म्युझिक " हे मला मिळालेले
"बाळकडू", आहे, "आरोग्य वर्धिनी असलेली "बालघुटी"आहे " अशी माझी "भावना"आहे.
इंटरनेटवर मी सहज शोधले आणि
फिल्म संगीताची "जादू" माझ्या बालमनावर का पडली असेल ? त्याचे उत्तर मिळाले..
1951 ज्यावर्षी मी जन्मलो..त्यावर्षी रिलीज
झालेले काही फिल्म्स--..बद्दल माहिती करून घेऊया
त्यासाठी पुढच्या भेटीत बोलू या..
------------------------------------------ -
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
------------------------------------------------
Friday, November 23, 2018
## आवडते फिल्मी- तारे -सितारे - अभिनेत्री वहिदा रेहमान
## आवडते फिल्मी -तारे -सितारे
----------------------------------------------------------------
अभिनेत्री -वहिदा रेहमान
------------------------------ ------------------------------ -----------------------
हिंदी चित्रपट -सृष्टीला अभिनय-निपुण अशा तारकांची मोठीच देणगी लाभत आलेली आहे . वैविध्पूर्ण भूमिका साकारीत असतांना .अभिनयाने या व्यःक्तीरेखा आपल्या नावाने ओळखल्या जाणे ", हे यश आणि कीर्ती या तारकांनी मिळवली आहे. अशा अभ्निंय संपन्न तारकांच्या यादीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री ...अभिनयसंपन्न -नृत्यनिपुण -सौंदर्यवती -अभिनेत्री -
वहिदा रेहमान
माझी अत्यंत आवडती अभिनेत्री .
आपल्या देखण्या व्यक्तिमत्वाने , प्रभावी अभिनयाने दीर्घ-काल गाजवलेली एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वहिदा रेहमान ओळखली जाते आहे.
१९५० हे माझा बालपणीचा काळ, आणि १९६० आणि १९७० या दोन दशकात मी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होतो ..
नेमकी हीच तीन दशके ..१९५०, १९६० आणि १९७० ..वहिदा रेहमान च्या अभिनय कार्क्कीर्दीचा सुवर्णकाळ होता ..
कोलेजला असतांना ..१९६८ ते १९७२ ..पीयूसी ते बीकॉम होई पर्यंतच्या काळात अंबाजोगाई ला असतांना तिथल्या " सागर आणि मोहन " या दोन्ही टाकीज मध्ये "वहिदा रेहमान चे बहुतेक सगळेच पिक्चर न चुकता पाहिले ....
राम और श्याम , नील कमल , मन की आंखे , धरती , शतरंज , पत्र के सनम , मेरी भाभ्बी , मन मंदिर ,खामोशी , आदमी , रेश्मा और शेरा .. असे काही पिक्चर ,त्यातील वहिदा रेहमानच्या भूमिका ,आणि गाणी माझ्या आठवणीत टवटवीत आहेत. असो.
१९५६ च्या -गुरुदत्त च्या - सीआयडी पासून वहिदा रेहमानची हिंदी चित्रपटातील कारकीर्द सुरु झाली
देव आनंद या सदाबहार अभिनेत्य बरोबर वहिदा रेहमानने अनेक चित्रपट केले जे खूप लोकप्रिय झाले .. सीआयडी -( १९५६,) सोलवा साल -(१९५८ ), काला बाजार -(१९६०) ,
बात एक रात की -(१९६२ ), , देव आनंद आणि वहिदा रेह्मांचा सर्वोत्तम चित्रपट -गाईड -(१९६५ )., असे असले तरी ..या जोडीचे
रूप की रानी चोरो का राजा -(१९६१ ) आणि प्रेम पुजारी - (१९७० ) हे दोन चित्रपट फ्लॉप म्हणूनच ओळखले जातात .
लागोपाठ तीन वर्ष -तीन पापुलर पिक्चर - वाहिदाची जोडी दिलीपकुमार बरोबर .. चित्रपट - दिल दिया दर्द लिया - (१९६६ ), राम और श्याम - (१९६७ ) आणि आदमी - (१९६८ ) ,
या उलट तीन ही पिक्चर - नायक -राजेंद्र कुमार बरोबर - १. पालकी , २. धरती , आणि शतरंज .. नायिका -बहिदा रेहमान -नायक राजेंद्र कुमार अन -लकी जोडी म्हणूनच लक्षात आहेत.
जुन्या जमान्यातील सस्पेन्स फिल्म मेहल नंतरचा सर्वात यशस्वी सस्पेन्स फिल्म म्हणून ओळखला जाणारा चित्रपट ..बीस साल बाद " या हिट- चित्रपटात वहिदा रेहमानचा नायक होता नवोदित -बंगाली हिरो - विस्वजीत ,.कोहरा आणि मजबूर " असे आणखी २ चित्रपट वहिदा रेहमानने विस्वजीत बरोबर केले
कवी शैलेंद्र निर्मित ."तिसरी कसम " या चित्रपटात तिचा नायक राज कपूर होता ..वेगळ्या धाटणीचा .तिसरी कसम " समीक्षकांनी गौरविला ,पण प्रेक्षकांनी साफ नाकारला ,राज कपूर बरोबर वहिदा रेहमान ..एक दिल और सौ अफसाने या चित्रपटात ही काम केले .
त्या काळात - प्रायोगिक म्हणता येतील असे दोन चित्रपट वाहिदाने सुनील दत्त बरोबर केले .वाहिदाच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक झाले ..पण रेश्मा और शेरा आणि मुझे जिने दो " हे दोन्ही चित्रपट फारसे चालले नाही ... .एक फुल चार कांटे, मेरी भाभी , दर्पण हे चित्रपट वहिदा रेहमान ने केले यात तिचा नायक सुनील दत्त होता.
पत्थर के सनम ", आदमी , नील कमल - यात तिचा नायक मनोज कुमार होता..
धर्मेंद्र सोबत ..बाजी , मन की आंखे ,असे काही चित्रपट केले .
वाहिदाच्या चतुरस्त्र अभिनयाने तिच्या अभिनित चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणाऱ्या ठरल्या आहेत .. काही उदाहरणे ,,आठवून पहा म्हणजे वहिदा रेहमान अभिनयसंपन्न तारका आहे याची आठवण होईल.
" प्यासा मधील - गुलाबो , कागज के फुल मधली - शांती , काला बाजार मधली- अलका ", चौदहवी का चंद - जमिला , साहिब बीबी और गुलाम मधली - जबा , मुझे जिने दो मधली- चमेली जान ,
" शगुन मधली गीता ", तिसरी कसम मधली - हिराबाई , "पालकी - मेहरू ", नील कमाल - राजकुमारी नीलकमल ,आणि सीता , खामोशी मधली - नर्स राधा , रेश्मा और शेरा -रेश्मा ..
हे चित्रपट आठवा ..या चित्रपटाचे वेगवेगळे कथानक आणि त्यातील नायिकांची विविध व्याक्तीरूप ..हे रोल करतांना ..वहिदा रेहमानच्या अभिनयाची वेगवेगळे पैलू आणि रंग दिसून येतात आणि समर्थ अशा अभिनेत्रीचे दर्शन होते ..आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात वहिदा रेहमानला यश मिळवता आले आहे .
वहिदा रेहमानच्या रोझी आणि नलिनी या गाईड मधल्या भूमिका आणि खामोशी मधली - नर्स -राधा ही भूमिका तिच्या अभिनय कलेचा सर्वोत्तम अविष्कार मानला जातो ,
गाईड मधील भूमिकेबद्दल वहिदा रेहमानला " १९६७ चा फिल्म फेअर सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार प्राप्त झाला."
१९७१ च्या फागुन मध्ये -धर्मेंद्र तिचा नायक होता - या फिल्म मध्ये वहिदा रेहमानने जया भादुरीच्या आईची भूमिका केली .. इथून वहिदा रेहमानची नायिका म्हणून कारकीर्द संपली .
१९७४ पासून वहिदा रेहमानच्या चरित्र -भूमेकातून परिपक्व आणि सयंतशील अभिनयाचे पैलू दिसून आले .. या सर्व भूमिका रसिकांना आवडल्या हे सांगणे न लगे .
१९७६ ते १९८९ या काळातील - कभी कभी , त्रिशूल , नमकीन , नमक हलाल , मशाल , चांदनी ..हे चित्रपट सहज आठवतात .
या नंतरच्या काळातील ..अलीकडचे म्हणता येतील असे .. ओम जय जगदीश - (२००२ ), रंग दे बसंती - (२००६ ), दिल्ली -६ (२००९ ) या चित्रपटातून वहिदा रेहमान यांचे दर्शन झाले आहे.
नृत्य कुशल - वहिदा रेहमानची ही गाणी -
१. मतवाली नार ठुमक ठुमक चली जाए- एक फुल चार कांटे, २. सुनो जी सुनो हमारी भी सुनो- एक दिल और सौ अफसाने , ३- एक दिल और सौ अफसाने -हाय मुहाबत हाय जमाने - शीर्षक गीत,
४- जंगल मी मोर नाचा किसने देखा - शतरंज , ५- आज फिर जिने की तमन्ना , ६- पिया तोसे नैना लागे रे , ७ - सर्प -नृत्य - गाईड , ८- रंगी ला रे - प्रेम पुजारी , ९. धीन क धीन -फागुन आयो रे - फागुन
वहिदा रेहमानवर चित्रित झालेली माझी आवडीची ही काही सदाबहार गाणी ..तुम्ही पण जरूर पहा...- सोलो सॉंग आहेत ही -
१. सच हुये सपने तेरे .. काला बाजार , २. बदले बदले मेरे सरकार नजर आते है ..चौदहवी का चांद , ३. भंवरा बडा नादान है ..साहिब बीबी और गुलाम ,
४ ए मुहबत मेरी दुनिया मी तेरा काम न था - बीस साल बाद , ५, ना तुम हमे जानो - बात एक रात की , ६ - ओ बेकरार दिल- कोहरा , ७. आ आभी जा रात ढल ने लगी - तिसरी कसम,
८. कल के सपने आज भी आना - दिल दिया दर्द लिया , ९, कारे बदरिया म्हारे लेहरिया - आदमी , १०. कोई नही है फिर भी है मुझ्को - पत्थर के सनम , ११, बाता दु क्या लाना - पत्थर के सनम ,
१२. नदी नाले न जाव शाम - मुझे जिने दो , १३, नस नस मी अगन - रेश्मा और शेरा , हे रोम रोम मी बसने वाले राम - नील कमल .
वहिदा रेहमान या आवडत्या अभिनेत्रीला अनेकानेक शुभेच्छा
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----
(आंतरजाल वरील उपलब्ध माहितीच्या आधारे केलेले लेखन )
-अभिनेत्री - वहिदा रेहमान
- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
------------------------------ -----------------------------
Sunday, August 5, 2018
लेख - स्मरण -सर्वप्रिय गायक म.रफी .
लेख -
ले- अरुण वि.देशपांडे
------------------------------ -----------------------------
३१ जुलै हा दिवस हिंदी फिल्म संगीत रसिका साठी भावव्याकुळ होण्याचा दिवस.३१ जुलै १९८० या दिवशी गायक म.रफी आपल्या अव्वाजातील हजारो गाणी मागे ठेवून या फानी -दुनियेला सोडून आपल्यातून निघून गेला , आज ३८ वर्षे झालीत रफीच्या जाण्याला ,पान आज ही रफीची असंख्य गाणी रसिकांच्या मनात जशीच्या तशी आहेत.
१९४६ च्या अनमोल घडी -संगीत नौशाद - या चित्रपटातील " तेरा खिलोना टूटा बालक.." या गाण्याने रफीच्या आवाजाला ओळख मिळण्यास सुरुवात झाली, एक गायक म्हणून त्याची प्रकाशझोतात येण्याची ही सुरुवात होती ..रफीची हे स्वर - पुढे ३४ वर्षे हिंदी चित्रपट संगीतास समृध्द करीत गेले . आजही रफीच्या आवाजाची मोहिनी त्याच्या आवाजाचे गारुड रसिकमनावर अधिराज्य गाजवते आहे.
नौशाद , शंकर -जयकिशन , मदनमोहन , रोशन, सचिन देव बर्मन , ओ .पी .नय्यर , चित्रगुप्त , रवी ,खय्याम , सलील चौधरी , लक्ष्मीकांत -प्यारेलाल , कल्याणजी -आनंदजी , राहुल देव बर्मन ,जयदेव हे प्रमुख संगीतकार सोबत रफीने एका पेक्षा एक सरस गाणी दिलीत ,त्याच बरोबर ..
उषा खन्ना , जी.एस.कोहली , सी.अर्जुन , सोनिक -ओमी , सपान-जगमोहन , सरदार मलिक , एस.एन.त्रिपाठी ,गणेश , प्रेमधवन , या संगीतकारांच्या साठी रफीने गायलेली गाणी .सदाबहार नगमे " आहेत ..हे विसरता येणार नाही.
रफीने बहुतेक सर्व कलाकारांना आपला आवाज दिला ..यात ..हिरो,विनोदी अभिनेते , चरित्र अभिनेते , सह-अभिनेते , खलनायक , अगदी एक्स्ट्रा म्हणवले जातील असे नगण्य -किरकोळ कलाकार ..या सर्वांचा समावेश आहे.
अशोक कुमार ,दिलीपकुमार, राजकपूर , देव आनंद , राजेंद्र कुमार , शम्मी कपूर , राजकुमार , मनोजकुमार , प्रदीप कुमार , भारतभूषण , धर्मेंद्र , जितेंद्र ,शशी कपूर ,राजेश खन्ना , विनोद खन्ना , विस्वजीत , जोय मुखर्जी ,सुजित कुमार , सुदेश कुमार , शैलेश कुमार .,जगदीप ..,प्रेमनाथ , प्राण , प्रेम चोप्रा , शत्रुघ्न सिन्हा ..यादी खूप मोठी आहे..असो.
जॉनी वॉकर आणि मेहमूद , या दोन प्रमुख विनोदवीरांना अनेक चित्रपटात रफीचा आवाज लाभला ..ही सोलो गाणी आणि युगल -गीत अजून ही तितकीच लोकप्रिय आहेत .
रफीची ही विशेष गोष्ट पहा - रसिकांच्या आवडीचा रफी .त्याच्या आवाजात .किती विविधता पूर्ण आहे हे -संगीतकार आणि रफीच्या जोडीवरून कल्पना येते -
१.नौशाद चा रफी , २. शंकर-जयकिशन आणि रफी - हा तर स्वतन्त्र आस्वाद-विषय आहे , ३.रवी आणि रफी ,
४.मदनमोहन आणि रफी , ५.चित्रगुप्त आणि रोशन यांचा रफी , ६.लक्ष्मीकांत -प्यारेलाल आणि रफी , .७.कल्याणजी -आनंदजी रफी ..
हे चित्रपट आणि त्यातले संगीत ,त्यातली गाणी , त्यातले कलाकार -या सगळ्या सोबत रफीच्या आवाजातली एक्से बढकर एक गाणी " म्हणजे हिंदी फिल्म-संगीताचा खजाना .
विशेष उल्लेख करण्यासारखे काही -...
१.संगीतकार रवी यांना त्यांचे पहिले फिल्मफेअर - १९६० साली..चौदहवी का चांद"साठी मिळाले ते गीत - रफीच्या आवाजातल्या शीर्षक गीता साठी .
२.लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचेही पहिले फिल्मफेअर - रफीच्या सोबतीने मिळाले - फिल्म-दोस्ती - १९६४ ,
गीत - चाहुंगा मै तुझे सांज सवेरे ..
३.आर.डी. बर्मन -पंचम - आणि रफी - १९७७ - फिल्म हम किसीसे कम नही .. क्या हुवा तेरा वादा...
४.शंकर-जयकिशन आणि रफी एक जबरदस्त जोडी ..या जोडीला ३ फिल्मफेअर अवार्ड मिळाले -
१. १९६१ - ससुराल - तेरी प्यारी प्यारी सुरत को...
२. १९६६ - सुरज - बहारो फुल बरसाओ..
३. १९६८ - ब्र्हम्चारी - दिल के झरोखे मे....
------------------------------ ---
रफीला मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार
१.१९६८ - फिल्म- नील कमल , गीत - बाबुल की दुवाये ..संगीतकार - रवी ,
२.१९७७ - फिल्म- हम किसीसे कम नही - क्या हुवा तेरा वादा.. संगीतकार - राहुल देव बर्मन
रसिक हो - रफीची सोलो गाणी असो की सह-गायकांच्या सोबतची गाणी असो ..ती लोकप्रिय आहेत ,रफी-लता ,रफी-आशा , रफी-शमशादबेगम , रफी- गीता दत्त , रफी- सुरैय्या , गायिका असो की ..
रफी -मन्ना डे, रफी- किशोर , रफी--मुकेश , रफी -तलत , रफी -महेंद्र कपूर , रफी- बलबीर असे सह-गायक असो
गाणे आपल्या मनात घर केल्या शिवाय रहात नाही.
माझाही आवडता गायक रफी - रफीची सगळीच गाणी मला आवडतात , नेहमी गुणगुणत असतो मी माझ्याशी रफीची गाणी , रफीच्या आवाजातील माझ्या अतिशय आवडीची काही गाणी लिस्ट करून देतो आहे तुम्ही जरूर ऐका .
या लिस्ट मधली ही गाणी म्हणजे रफीच्या हरहुन्नरी आवाजाची प्रचीती देणारी अशीच आहेत ..
म.रफीची ही सोलो songs- एकल गाणी -
------------------------------ ------------------------------ --------------
गीत फिल्म - संगीतकार
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------
१.पास बैठो तबियत बहेल जायेगी - पुनर्मिलन - सी. अर्जुन .
२.मुझे तुमसे मुहब्बत है.. बचपन - सरदार मलिक
३. हम तुमसे जुदा हो के एक सपेरा एक लुटेरा उषा खन्ना
४.मैने रख्खा है मुहब्बत शबनम उषा खन्ना
५.तेरी गलियो मे न .... हवस उषा खन्ना
६. अभी क्म्सीन हो, नादा हो .. आंधी और तुफान लक्ष्मीकांत -प्यारेलाल
७. चल उड जा रे पंछी .. भाभी चित्रगुप्त
८. कल चमन था आज एक .. खानदान रवी
९. लग जा गले दिलरुबा दस लाख रवी
१०.सौ बार जनम लेंगे उस्तादो के उस्ताद रवी
११.दिवाना केह के आज मुझे मुजरीम रवी
१२.ये शमा तो जली आया सावन झुमके लक्ष्मी-प्यारे
१३.आनेसे उस के आये बहार जिने की राह लक्ष्मी-प्यारे
१४.खिलोना जान कर तुम तो . खिलौना लक्ष्मी-प्यारे
१५.पर्देसियो से न आखीया जब जब फुल खिले कल्याणजी -आनंदजी
१६.चले थे साथ मिलकर हसीना मान जायेगी कल्याणजी -आनंदजी
१७.सुख के सब साथी गोपी कल्याणजी -आनंदजी
१८.बडी दूर से आये है समझोता कल्याणजी -आनंदजी
१९.दिल ने प्यार किया है .. शरारत गणेश
२०.अपनी आंखो मे बिठा कर ठोकर श्यामजी घन्श्याम्जी
२१. फिर आने लागा याद व्ही .. ये दिल कीस को दु इक्बाल कुरेशी
२२. जाने क्या धुंडती रेहती है .. शोला और शबनम खय्याम
२३. तुम चली जाओगी .. शगुन खय्याम
२४ .है कली कली के लब पर लाला रुख खय्याम
२५ . मना मेरे हसीन सनम .. एद्व्हेन्चार्स ऑफ
रोबिन हूड जी.एस. कोहली
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
रसिक हो ..नौशाद , शंकर जयकिशन , मदनमोहन , रोशन , सचिन देव बर्मन , जयदेव ,सलील चौधरी यांची रफीच्या आवाजातली गाणी ..तुमच्या माझ्या मनात ..आजच्या लेखात .थोडे भुले बिसरे गीत - घेतलीत .
प्रिय गायक रफीला भावांजली ...!
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------ लेख -
स्मरण -सदाबहार -सर्वप्रिय गायक म.रफी .
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
------------------------------ ------------------------------ ------------
Tuesday, July 24, 2018
लेख- -स्मरण एका विनोद्वीराचे- मेहमूद - -अरुण वि.देशपांडे -पुणे.
लेख- -स्मरण एका विनोद्वीराचे- मेहमूद -
------------------------------ ------------------------------ ----
(हा लेख मित्रवर्य श्री. श्रीपाद कुलकर्णी SRK यांच्या श्रीपाद रेडियोवर प्रसारित झाला आहे. त्यांचे आभार.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मेहमूद -
(२९-०९-१९३२ ते २३-०७-२००४ )
------------------------------ ------------------------------ -----
आज २३ जुलै , लोकप्रिय विनोदी कलावंत , अभिनेता , गायक , निर्माता मेहमूद याची पुण्यतिथी , हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात मेहमूद च्या आठवणी त्याने साकारलेल्या अविस्मरणीय अशा अनेक व्यक्तीरेखांमुळे कायम आहेत.
आपल्या फिल्मी कारकिर्दीत मेहमूद ने ३०० पेक्षा जास्त चित्रपटात ..नायक, सहनायक ,आणि विनोदी कलाकार म्हणून भूमिका केल्या , एक हरहुन्नरी - विनोदी कलावंत म्हणून मेहमूदला प्रचंड लोकप्रियता मिळाली .
एक बाल-कलाकार म्हणून मेहमूदची फिल्मी करियर सुरू झाली ..किस्मत " (१९४५)..या फिल्म मध्ये तो बाल-कलाकाराच्या भूमिकेत चमकला . त्या नंतर ." सीआयडी ", दो बीघा जमीन , प्यासा "अशा काही चित्रपटात त्याने किरकोळ भूमिका केल्या , काही सामान्य चित्रपटात मेहमूद नायक म्हणून पडद्यावर दिसला पण नायकाच्या भूमिकेत त्याला रसिकांनी फारसे स्वीकारले नाही ..यातले त्याचे अनेक चित्रपट त्यातील गाण्यांमुळे लक्षात आहेत.
मेहमूदला अफाट लोकप्रियता मिळवून दिली ती त्याच्या विनोदी भूमिकांनी .. विशेषतः हैद्राबाद बोलीचा उपयोग करून मेहमूदने आपल्या विनोदाने कहर केला ..गुमनाम ,साधू और शैतान मधील त्याच्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या.
प्रत्येक फिल्मी -कलाकारच्या कारकिर्दीत "फिल्मफेअर अवार्डचे महत्व खूप मोठे आहे. या दृष्टीने मेह्मुद्ची कामगिरी विलक्षणच आहे असे म्हणावे लागेल.१९५४ साला पासून फिल्मफेअर आवार्ड देण्यास सुरुवात झाली सुरुवातीला कॉमेडी -रोल साठी स्वतंत्र अवार्ड नव्हते .. फिल्मफेअर अवार्ड फोर बेस्ट कॉमिक रोल .सुरु झाले ते १९६७ सालापासून .. त्यानंतर या बेस्ट कॉमिक रोल साठी मेह्मुदला तब्बल २५ वेळा नामांकन मिळाले..
१९५८ साली प्रदर्शित "छोटी बहेन " या चित्रपटापासून फिल्मी पडद्यावर मेहमूद चे अस्तित्व जाणवले आणि पुढे कित्येक वर्ष आघाडीचा विनोदवीर म्हणून मेहमूद प्रेक्षकांच्या आवडीचा होता.
१९७० या दशकाच्या अखेरपर्यंत इतर समकालीन विनोदवीर कलाकारांच्या तुलनेत मेहमूद सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेता होता.
फिल्मफेअर अवार्ड आणि मेहमूद
------------------------------ -------------------------
१. फिल्म फेअर बेस्ट सपोर्टिंग अक्टर - १९६३ - मेहमूद फिल्म- दिल तेरा दिवाना .
फिल्मफेअर अवार्ड फोर कॉमिक रोल - मेहमूद
------------------------------ ------------------------
१. १९६३ - फिल्म प्यार किये जा ,
२.१९७० - फिल्म - वारीस ,
३.१९७२ - फिल्म- पारस ,
४.१९७५ -फिल्म- वरदान
विनोदी भूमिकेत त्याची इतकी प्रभावी कामगिरी होत असे की ,,मेहमूदला
१९५९ ते ते १९६६ या दरम्यान त्याला बेस्ट सपोर्टिंग अक्टर साठी नामांकन मिळत गेले ते असे..
१. १९५९ - फिल्म- छोटी बहेन , २.१९६२ - फिल्म- ससुराल , ३.१९६३- फिल्म- राखी ,
४. १९६४ - घर बसा के देखो , ५. १९६६ - गुमनाम .
१९६८ ते १९८३ या पंधरा वर्षांच्या काळात रुपेरी पडदा मेहमूदच्या कॉमेडी रोलने जणू व्यापून टाकलेला होता ,त्याच्यासाठी प्रेक्षक फिल्मला जात असत.
त्याच्या या बहारदार कामगिरी मुळे मेहमूदचे नामाकन बेस्ट कॉमिक रोल साठी होत गेले ते असे..
१.१९६७ - लव्ह इन टोकियो, २. १९६८ - फिल्म -मेहरबान , ३. १९६९ -फिल्म नीलकमल , ४. .१९६९ - फिल्म- साधू और शैतान , ५. १९७० - फिल्म- हमजोली , ६- १९७० - फिल्म- मेरी भाभी ,
७. १९७१ - मै सुंदर हु , ८- १९७३ - फिल्म- बॉम्बे टू गोवा , ९- १९७४ - दो फूल , १०- १९७५ -फिल्म- दुनिया का मेला,
११. १९७५ - फिल्म- कुंवारा बाप , १२. १९७५- फिल्म- कैद , १३. १९७६ - सब से बडा रुपैय्या , १४- १९८०- फिल्म-नौकर , आणि १५. १९८०- खुद्दार .
मेहमूद विशेष-
निर्माता म्हणून मेहमूद ने मध्ये भूत बंगला ' या चित्रपटातून पंचम - आर.डी.बर्मन हा संगीतकार चित्रपट सृष्टीला दिला ,मेह्मुद्च्या छोटे नवाब "या चित्रपटापासून आर.डी.चे संगीत लोकप्रिय ठरण्यास सुरुवात झाली .
२.
पडोसन " हा हिंदी चित्रपट इतिहासात सर्वश्रेठ विनोदी चित्रपट म्हणून ओळखला जातो .हा चित्रपट निर्मित करण्यात निर्माते एन सी सिप्पी सोबत मेहमूदचा सह्बाग होता . पडोसन "मधील मेहमूदच्या मद्रासी -संगीत मास्तर च्या रोल ने धमाल उडवली होती. सोबत किशोरकुमार , केश्तो मुखर्जी , ओमप्रकाश आणि अनेक विनोदवीर या चित्रपटात होते. आर.डी चे संगीत .गीतकार राजेंद्र कृष्ण यांचे एक चतुर नार कर के सिंगार ..या गीतात किशोरकुमार ,मन्ना डे,आणि स्वतहा मेहमूद यांची धमाल पडद्यावर मोठी धमाल उडवते . सुनीलदत्त -सायरा बानो हे नायक- नायिका होते .पण लक्षात राहिला तो मेहमूद अभिनित मद्रासी संगीत - मास्तर .
मेहमूदच्या फिल्म्स चे एक वैशिट्य सांगायचे झाल्यास .चित्रपटात रूढ अर्थाने जे नायक-नायिका असत, त्या जोडी पेक्षा जास्त भाव खाऊन जायची ती ..१. मेहमूद - शुभा खोटे ही जोडी , त्यानंतर - दुसरी जोडी फेमस झाली ती - मेहमूद - मुमताज ही जोडी आणि शेवटी - मेहमूद -अरुणा इराणी ही जोडी तितकीच गाजली.
मेहमूद -शुभा खोटे या जोडीचे चित्रपट -
छोटी बेहन , ससुराल , हमराही , बेटी बेटे , गृहस्थी , भरोसा , सांज और सवेरा , जिद्दी , लव्ह इन टोकियो .
मेहमूदला हिरोच्या बरोबरीने सोलो गीत ,युगल गीत असायची ही सर्व गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत ..
शंकर-जयकिशन , आर.डी. बर्मन , एस. डी. बर्मन लक्ष्मीकांत -प्यारेलाल , कल्याणजी -आनंदजी , रोशन , रवी ,,चित्रगुप्त अशा दिग्गज अशा संगीतकारांनी मेहमूदला सदाबहार गाणी दिलीत .
मन्ना डे, , म.रफी , मुकेश , किशोर कुमार यांनी मेहमूदची सोलो गाणी म्हटली ..तर युगल गीत - लता -रफी , अशा-रफी , किशोर -लता , किशोर-अशा , मन्ना डे- आशा , मन्ना डे- गीता दत्त यांच्या आवाजात आहेत.
मेहमूदच्या काही लोकप्रिय युगल -गाण्याची आठवण -
------------------------------ ------------------------------ -
१.मै रंगीला प्यार का राही- छोटी बहेन -लता मंगेशकर सुबीर सेन , संगीत- शंकर- जयकिशन
२. अपनी उल्फत पे जमाने का - ससुराल - लता- मुकेश , संगीत- शंकर -जयकिशन
३. वो दिन याद करो - हमराही - लता -रफी , संगीत- शंकर - जयकिशन
४. गोरी चलो ना हंस की चाल - बेटी बेटे - आशा - रफी , संगीत - शंकर - जयकिशन
५. आज हु ना आये बालमा - सांज और सवेरा - रफी-सुमन कल्याणपूर , संगीत शंकर - जयकिशन
६. जा जा रे जा दिवाने जा - गृहस्थी - रफी- आशा , संगीत- रवी ,
७. मै तेरे प्यार मी क्या क्या - जिद्दी - मन्ना डे - गीता दत्त , संगीत - एस. डी. बर्मन ,
८. बहारो थाम लो अब दिल - नमस्ते जी - लता - मुकेश , संगीत - जी.एस. कोहली ,
९. तुम्ही मेरे मित हो - प्यासे पंची - हेमंतकुमार - सुमन कल्याणपूर , संगीत- कल्याणजी -आनंदजी
१०. ओ मेरी मैना - प्यार किये जा - मन्ना डे - उषा मंगेशकार , संगीत- लक्ष्मीकांत -प्यारेलाल ,
११.जोडी हमारी जमेगा कैसे - औलाद - मन्ना डे - अशा भोसले , संगीत - चित्रगुप्त
१२. कभी दुष्मनी-कभी दोस्ती - भरोसा - रफी - आशा , संगीत- रवी
१३. मुत्तू कोडी कवाडी हरा .. -दो फुल - मेहमूद -आशा भोसले , संगीत- आर.डी. बर्मन
१४. चंदा ओ चंदा - लाखो मे एक - लता - किशोर , संगीत- आर.डी. बर्मन
१५. दे दे अल्ला के नाम दे ,तुझको अल्ला रख्खे - आंखे - मेहमूद -मन्ना डे-आशा भोसले , संगीत- रवी
१६.जाब जाब हम तुमको देखे है रे .. मस्ताना - लता -किशोर , संगीत- लक्ष्मीकांत -प्यारेलाल
१७. नाच मेरी जान फाटा फत - मै सुंदर हु - किशोर - आशा , संगीत - शंकर -जयकिशन
१८. घुंगरवा मोर छम छम बाजे - जिंदगी - रफी- आशा , संगीत -शंकर- जयकिशन .
***************
मित्र हो , मेहमूद माझा आवडता कलावंत ,२३ जुलै २००४ साली तो आपल्या हजारो चाहत्यांना सोडून गेला ,त्याच्या भूमिका , ताचे चित्रपट आणि लोकप्रिय गाणी हा त्याचा ठेवा आपल्यासाठी आहे.. त्याच्या स्मृतीस हे अभिवादान.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
मो-९८५०१७७३४२
----------------------------------------------------------------------------------
Friday, July 7, 2017
शीर्षक -गीतं -टायटल सॉंग- संगीतकार शंकर जयकिशन
मित्रहो
,शंकर-जय-किशन
यांचे संगीत लाभलेल्या चित्रपटातील शीर्षक- गीतांची ही लिस्ट पाहून
,त्यांच्या संगीतमय वाटचालीचे आश्चर्य वाटू लागते .एका पेक्षा एक सरस अशी
ही गीतं वर्षानु-वर्षे आपण एकात आलो आहोत तरी या संगीताची जादू कायम आहे.
शीर्षक गीतं - टायटल सॉंग- संगीतकार शंकर जयकिशन
------------------------------ ------------------------------ ------------------------------
शंकर-जयकिशन यांचे संगीत आणि राजकपूर -ही लिस्ट सगळ्यात मोठीच असणार हे उघड आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------
१.
– बरसात – राजकपूर –नर्गीस
,प्रेमनाथ ,निम्मी
बरसात मे हमसे मिले तुम सजन ... लता मंगेशकर
२.
आवारा – राजकपूर , नर्गीस
आवारा हुं..या गर्दिश मे हुं असमान का तारा हुं-
मुकेश ,
३.
अनाडी- राजकपूर , नूतन
सब कुच्ह सिखा हमने न सिखी होशियारी – मुकेश .
४.
जिस देश मे गंगा बेह्ती है –
राजकपूर ,पद्मिनी
मुझको यारो माफ करना मै नशे मी हू... मुकेश ,
८.
आशिक – राजकपूर ,पद्मिनी ,
नंदा
मै आशिक
हुं बहारो का नाजारो का --- मुकेश ,
९.
सपनो का सौदागर – राजकपूर ,
हेमा मालिनी
सपनो का सौदागर आया लेलो सपने लेलो – मुकेश ,,
१० अराउंड दि वर्ल्ड – राजकपूर , राजश्री
दुनिया की सैर कर लो ,इन्सान के दोस्त बन
कर – मुकेश ,शारदा ,
११.
दिवाना – राजकपूर ,
सायराबानू
दिवाना
मुझको लोग काहे ,मै समझू जग है दिवाना .. मुकेश ,
१२.
संगम – राजकपूर , वैजयंतीमला , राजेंद्रकुमार ,
मेरे मन की गंगा और तेरे मन की जमना का बोल राधा
बोल
संगम होगा के नही
..मुकेश – वैजयंतीमाला,
१३ .
कल आज और कल .पृथ्वीराजकपूर ,राजकपूर ,रणधीरकपूर , बबिता
टिक टिक,चलती जाये घडी ,कल आज और कल के
पल पल .. आशा –किशोर
------------------------------ ------------------------------ ------------------------------
देव आनंद
१.
लव्ह –म्यारेज – देव आनंद –
माला सिन्हा
१.दिल से दिल टकराये , लव्ह
म्यारेज कर आये ...गीता दत्त , म.रफी –कोरस ,
२. जब प्यार कीसेसे होता है – देव आनंद – आशा
पारेख
१. म.रफी , २. लता मंगेशकर ,
३. रूप की रानी- चोरो का राजा – देव आनंद – वहिदा
रहमान
तू रूप की रानी- मैं चोरो का राजा तेरा मेरा
प्यार निराला- तलत महमूद – लता मंगेशकर
४ . प्यार मुहब्बत – देव
आनंद – सायराबानू
प्यार मुहब्बत के सिवा ये जिंदगी क्या जिंदगी –
किशोरकुमार –आशा भोसले
१.
लाख छुपाव छुप ना साकेगा
राज वो कितना गेहरा – लता मंगेशकर ,
२.
कल की दौलत आज की खुशिया
,असली क्या है ,नकली क्या है – म.रफी
७.
दुनिया – देव आनंद –
वैजयंतीमाला
दुनिया मी सब चेहेरे ,दुनिया इसी का नाम है – मुकेश –शारदा------------------------------
शम्मीकपूर ..
१.
सिंगापूर – शम्मीकपूर , पद्मिनी
जीवन
मे एक बार आना सिंगापूर ....लता मंगेशकर आणि कोरस ,
ये
शेहर बडा अलबेला चौ तरफ हसीनो का मेला – मुकेश आणि कोरस ,
२.
दिल तेरा दिवाना – शम्मीकपूर , माला सिन्हा
दिल तेरा
दिवाना है सनम ... म.रफी , लता मंगेशकर ,
३.
जंगली –
शम्मीकपूर , सायराबानू
चाहे
कोई मुझे जंगली कहे ...म.रफी ,
४.
राजकुमार – शम्मीकपूर ,साधना
१.
आजा आई बहार दिल है बेकरार
..ओ मेरे राजकुमार – लता मंगेशकर ,
२.
जानेवाले जरा होशियार यहा
के हम है राजकुमार ..म.रफी ,
५.
बदतमिज – शम्मीकपूर , साधना
बत्तमिज कहो या कहो जानवर मेरा दिल तेरे दिल पर ..म.रफी ,
६.
जवा मोहबत – शम्मी कपूर –आशा पारेख
१.जवान
मुहब्बत जहा जहा है ...म.रफी ,
२. जवा
मुहब्बत –जवा मुहब्बत – म.रफी
७. तुमसे अच्छा कौन है .. शम्मीकपूर , बबिता
कभी हमने नही सोचा था .पत्थर दिल भी
पिघ्लेगा – म.रफी
८ पगला कही का - शम्मीकपूर – आशा पारेख
आशिक हुं एक मेह्जाबी का लोग काहे मुझे
पगला खी का – म.रफी ,
९.
जाने अनजाने – शम्मी कपूर –
लीना चंदावरकर
१.
जाने अनजाने यहा सभी है
दिवाने – शारदा
२.
लोग मिले ,पर मिला न कोई अपना – किशोरकुमार
९ एन इव्हनिंग इन पैरीस- शम्मी कपूर –शर्मिला
टागोर
अजी आईसा मौका फिर कहा मिलेगा .. म.रफी
------------------------------ ------------------------------ ------------------------------
मनोजकुमार
१.हरियाली और रस्ता –
मनोजकुमार ,माला सिन्हा
१.ये हरयाली और ये रास्ता ,इन राहो पर तेरा
मेरा जीवनभर का वास्ता –लता मंगेशकर .
२. बोल मेरी तकदीर मे क्या है मेरे हमसफर अब तो
बता .. मुकेश – लता मंगेशकर
२. अपने हुये पराये –
मनोजकुमार – माला सिन्हा
अपने हुये पराये किस्मत ने क्या दिन दिख्लाये –
लता मंगेशकर
३.
गुमनाम – मनोजकुमार – नंदा
गुमनाम है कोई
बदनाम है कोई ...लता मंगेशकर
४.
पेहचान – मनोजकुमार – बबिता
सब से बडा नादान वही जो समझे नादान मुझे – मुकेश
५.
सन्यासी – मनोजकुमार –
हेमामालिनी
चल सन्यासी मंदिर में.... मुकेश , लता मंगेशकर
६.
बेईमान – मनोजकुमार – राखी
ना इज्जत की चिंता ना रोटी कि फिकर – मुकेश------------------------------
राजेंद्रकुमार ---
१.
आस का पंछी – राजेंद्रकुमार
– वैजयंतीमाला
दिल मेरा एक आस का पंछी ...
सुबीर सेन
२.
हमराही – राजेंद्रकुमार –
जमुना
मुझ को अपने गले लगाओ ऐ
मेरे हमराही – म.रफी – मुबारक बेगम
३.
दिल एक मंदिर –
राजेंद्रकुमार, मीनाकुमारी , राजकुमार
जानेवाले कभी नही आते ,जानेवाले
की याद आती है – म.रफी –लता मंगेशकर
४.
आई मिलन की बेला –
राजेंद्रकुमार – सायराबानू
अहा आई मिलन की बेला देखो
आई ... म.रफी ,आशा भोसले आणि कोरस .
५.
अमन - राजेंद्रकुमार – सायराबानू,
अमन का फरिश्ता कहा जा रहा
है .. म.रफी
६
झुक गया आसमान – राजेंद्रकुमार – सायराबानू
कौन है जो सपनो मे आया –कौन है जो दिल में
समाया – म.रफी
------------------------------ ------------------------------ ------------------------------
धर्मेंद्र
१.
तुम हसीन मै जवा – हेमा मालिनी
आप को पहले भी खी देखा है
... म.रफी – आशा भोसले
२.
यकीन – धर्मेंद्र – शर्मिला
टागोर ..
यकीन करलो मुझे मुहब्बत है
तुमसे तुमसे ...म.रफी
३.
प्यार ही प्यार – धर्मेंद्र
– वैजयंतीमाला
देखा है तेरी आंखो में
प्यार ही प्यार बेशुमार .. म.रफी
४.
शिकार – धर्मेंद्र –आशा
पारेख .
तुम्हारे प्यार में हम बेकरार
हो के चले ,शिकार करनेको आये शिकार हो के चले ..म.रफी ,
५.
रेशम की डोरी- धर्मेंद्र –
सायराबानू
बेह्ना ने भाई कि कलाई पर
प्यार बांधा है – सुमन कल्याणपूर .
६.
इंटरनशनल क्रूक – धर्मेंद्र –सायराबानू
क्रूक क्रूक इंटरनेशनल
क्रूक ... महेंद्रकपूर आणि कोरस
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------
– जितेंद्र
१.
गुनाहो का देवता – जितेंद्र
–राजश्री
चाहता बनू प्यार की राहो का देवता ,मुझको बना
दिया है गुनाहो का देवता ..मुकेश.
२.
मेरे हुजूर .. जीन्तेन्द्र –माला
सिन्हा , राजकुमार
रुख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर ... म.रफी
...
३.
यार मेरा – जितेंद्र – राखी
हाय यार मेरा .कुच्ह इस अंदाज से चला .. म.रफी
आता बाकीची शीर्षक गीतं
१.
एप्रिल फुल - विस्वजीत –सायराबानू
एप्रिल फुल बनाया तो उनको
गुस्सा आया..म.रफी
२.
हरे कांच की चुडिया – विस्वजीत – नयना साहू
धानी चुनरी पेह्न ..बज उठी
है हरी कांच की चुडीया ..आशा भोसले
१.
काली घटा- बीना राय –किशोर साहू
काली घटा घीर आई रे ..ओ
मधुर मिलन है ..म.रफी –लता मंगेशकर ,
२.
दिल अपना और प्रीत पराई-
मीनाकुमारी , राजकुमार
दिल अपना और प्रीत पराई
किसने है ये रीत बनाई ..लता मंगेशकर ,.
३.
सांज और सवेरा – मीनाकुमारी
– गुरुदत्त
यही है वो सांज और सवेरा
,जिसके लिये तडपे हम ..म.रफी , आशा भोसले
४.
छोटी सी मुलाकात –
वैजयंतीमाला – उत्तमकुमार
छोटीसी मुलाकात प्यार बन
गई...म.रफी. आशा भोसले ,
५.
रात और दिन – नर्गीस
,प्रदीपकुमार ,फिरोजखान
१.रात और दिन दिया जले
..लता मंगेशकर
२.रात और दिन दिया जले –
मुकेश
६. कठपुतली – वैजयंतीमाला , बलराज सहानी
बोल रे कठपुतली डोरी कौन संग बांधी सच
बतला तू नाचे किसके लिये ..लता मंगेशकर ,शैलेन्द्र
७
रंगोली – वैजयंतीमाला
किशोरकुमार
रंगोली सजाव रे रंगोली सजाव
.. किशोरकुमार ,
७.
लव्ह इन टोकियो – जोय
मुखर्जी –आशा पारेख
जापान लव्ह इन टोकियो ..ले
गई दिल गुडिया जापान की ..म.रफी ,
८.
अर्चना –माला सिन्हा –संजीवकुमार
तन मन तेरे रंग रंग रंगुगी ..लता
मंगेशकर ..
९.जहा प्यार मिले – शशी कपूर –हेमा मालिनी
१. चले जा चले जा जहा प्यार मिले ..सुमन
कल्याणपूर
२. चले जा चले जा जहा प्यार मिले ..म.रफी
१०. आंखो आंखो में- राखी –राकेश रोशन
आंखो आंखो में बात होने दो मुझ को अपनी
बाहोमे सोने दो..किशोर –आशा ,
११ दुनिया क्या जाने- भारती –प्रेमेंद्र
मेरे नैन बावरे हसते है या रोते है .दुनिया
क्या जाने..लता मंगेशकर ,
१२ नादान – आशा पारेख – नवीन निश्चल
बोल
नादान दिल तुझे क्या हो गया .. आशा भोसले ..हसरत जयपुरी .
१३ रिवाज – माला सिन्हा –संजीवकुमार
प्यार में रिवाज टूटे ना कही... किशोरकुमार ,
आशा भोसले .
१४ अलबेला – मेहमूद –अरुणा इराणी
सुल्तानो का सुलतान मैं हु अलबेला –
किशोरकुमार – मेहमूद ,
१५. दिल दौलत दुनिया – राजेश खन्ना –साधना
दिल दौलत और दुनिया ..किशोरकुमार –आशा
भोसले
१६. पुनम- किशोर साहू
चांद पूनम का खिला – लता मंगेशकर .
१७. दुनियादारी – विनोद मेहरा , नूतन
नाव कागज की गेहरा है पानी,जिंदगी कि यही है
कहानी – म.रफी –लता मंगेशकर ,
१८ दो झूट – विनोद मेहरा , मौसमी चाटर्जी
दो झुठ जिये एक सच के लिये ...लता मंगेशकर ,
लेख - शीर्षक गीतं -टायटल सॉंग - संगीतकार –शंकर
जयकिशन
ले- अरुण वि .देशपांडे –पुणे.
मो- ९८५०१७७३४२
------------------------------Tuesday, June 14, 2016
लोकप्रिय हिंदी चित्रपट -१९६३
1963 was the year of Ashok Kumar & he gave three super hit movies and one of his movie names Mere Mehboob was the highest earner of that year. Beside this veteran actor the other who also known in that year was Sadhna, the famous & beautiful actress of Bollywood. Below is the list of top ten Bollywood movies of 1963 that were super hit & earned a superb amount.
The top ten grossing films at the Indian Box Office in 1963:
1. Mere Mehboob - Rajendra Kumar, Sadhana, Ashok Kumar, Nimmi, J. Walker
2. Taj Mahal -
3. Phir Wohi Dil Laya Hoon - Asha Parekh, Joy Mukherjee
4. Gumrah - Sunil Dutt, Mala Sinha, Ashok Kumar
5. Dil Ek Mandir - Rajendra Kumar, Meena Kumari, Raaj Kumar
6. Tere Ghar Ke Saamne -
7. Shikari -
8. Mujhe Jeene Do - Sunil Dutt, Waheeda Rehman
9. Gehra Daag - Mala Sinha, Rajender Kumar
10. Bandini - Dharmendra, Nutan, Ashok Kumar
List of all the Bollywood Movies that released in 1963, Super Hit Movies of 1963:
Aaj Aur Kal
Star Cast: Sunil Dutt, Nanda
Akeli Mat Jaiyo
Director: Nandlal Jashwantlal
Star Cast: Meena Kumari, Rajendra Kumar
Bandini
Director: Bimal Roy
Star Cast: Dharmendra, Nutan, Ashok Kumar
Begaana
Star Cast: Dharmender, Supriya Chowdhary
Bharosa
Star Cast: Guru Dutt, Asha Parekh
Bin Badal Barsaat
Star Cast: Biswajeet, Asha Parekh, Nishi
Bluff Master
Star Cast: Shammi Kapoor, Saira Banu
Dil Ek Mandir
Star Cast: Rajendra Kumar, Meena Kumari, Raaj Kumar
Dil Hi To Hai
Star Cast: Raj Kapoor, Nutan, Pran
Ek Dil Sao Afsane
Star Cast: Raj Kapoor, Waheeda Rehman
Ek Raaz
Star Cast: Kishore Kumar
Faulad
Star Cast: Dara Singh
Gehra Daag
Star Cast: Mala Sinha, Rajender Kumar
Godaan
Star Cast: Raaj Kumar, Kamini Kausha
Grahasti
Star Cast: Ashok Kumar, Nirupa Roy, Manoj Kumar, Rajshree
Gumrah
Star Cast: Sunil Dutt, Mala Sinha, Ashok Kumar
Hamrahi
Star Cast: Rajender Kumar, Jamuna, Mehmood, Shobha Khote
Harishchandra Taramati
Director: Adarsh
Star Cast: Prithviraj Kapoor, Jaymala
The Householder
Star Cast: Shashi Kapoor, Jennifer
Mere Mehboob
Star Cast: Rajendra Kumar, Sadhana, Ashok Kumar, Nimmi, J. Walker
Meri Surat Teri Ankhen
Star Cast: Ashok Kumar, Asha Parekh,Pradeep Kumar
Mujhe Jeene Do
Star Cast: Sunil Dutt, Waheeda Rehman
Nartakee
Star Cast: Sunil Dutt, Nanda
Phir Wohi Dil Laya Hoon
Star Cast: Asha Parekh, Joy Mukherjee
Rustom Sohrab
Star Cast: Prithviraj Kapoor, Dara Singh
Sehra
Star Cast: Sandhya, L. Pawar, Mumtaz
Shaheed Bhagat Singh
Star Cast: Manoj Kumar, Kamini Kaushal, Pran, Prem Chopra
Tere Ghar Ke Samne
Star Cast: Dev Anand, Nutan
Ustadon Ke Ustad
Star Cast: Ashok Kumar, Pradeep Kumar, Shakeela, Sheikh Mukhtar
Yeh Rastey Hain Pyar Ke
Star Cast: Sunil Dutt, Leela Naidu
You might also like:
Subscribe to:
Comments (Atom)

