## आवडते फिल्मी -तारे -सितारे
----------------------------------------------------------------
अभिनेत्री -वहिदा रेहमान
------------------------------ ------------------------------ -----------------------
हिंदी चित्रपट -सृष्टीला अभिनय-निपुण अशा तारकांची मोठीच देणगी लाभत आलेली आहे . वैविध्पूर्ण भूमिका साकारीत असतांना .अभिनयाने या व्यःक्तीरेखा आपल्या नावाने ओळखल्या जाणे ", हे यश आणि कीर्ती या तारकांनी मिळवली आहे. अशा अभ्निंय संपन्न तारकांच्या यादीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री ...अभिनयसंपन्न -नृत्यनिपुण -सौंदर्यवती -अभिनेत्री -
वहिदा रेहमान
माझी अत्यंत आवडती अभिनेत्री .
आपल्या देखण्या व्यक्तिमत्वाने , प्रभावी अभिनयाने दीर्घ-काल गाजवलेली एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून वहिदा रेहमान ओळखली जाते आहे.
१९५० हे माझा बालपणीचा काळ, आणि १९६० आणि १९७० या दोन दशकात मी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होतो ..
नेमकी हीच तीन दशके ..१९५०, १९६० आणि १९७० ..वहिदा रेहमान च्या अभिनय कार्क्कीर्दीचा सुवर्णकाळ होता ..
कोलेजला असतांना ..१९६८ ते १९७२ ..पीयूसी ते बीकॉम होई पर्यंतच्या काळात अंबाजोगाई ला असतांना तिथल्या " सागर आणि मोहन " या दोन्ही टाकीज मध्ये "वहिदा रेहमान चे बहुतेक सगळेच पिक्चर न चुकता पाहिले ....
राम और श्याम , नील कमल , मन की आंखे , धरती , शतरंज , पत्र के सनम , मेरी भाभ्बी , मन मंदिर ,खामोशी , आदमी , रेश्मा और शेरा .. असे काही पिक्चर ,त्यातील वहिदा रेहमानच्या भूमिका ,आणि गाणी माझ्या आठवणीत टवटवीत आहेत. असो.
१९५६ च्या -गुरुदत्त च्या - सीआयडी पासून वहिदा रेहमानची हिंदी चित्रपटातील कारकीर्द सुरु झाली
देव आनंद या सदाबहार अभिनेत्य बरोबर वहिदा रेहमानने अनेक चित्रपट केले जे खूप लोकप्रिय झाले .. सीआयडी -( १९५६,) सोलवा साल -(१९५८ ), काला बाजार -(१९६०) ,
बात एक रात की -(१९६२ ), , देव आनंद आणि वहिदा रेह्मांचा सर्वोत्तम चित्रपट -गाईड -(१९६५ )., असे असले तरी ..या जोडीचे
रूप की रानी चोरो का राजा -(१९६१ ) आणि प्रेम पुजारी - (१९७० ) हे दोन चित्रपट फ्लॉप म्हणूनच ओळखले जातात .
लागोपाठ तीन वर्ष -तीन पापुलर पिक्चर - वाहिदाची जोडी दिलीपकुमार बरोबर .. चित्रपट - दिल दिया दर्द लिया - (१९६६ ), राम और श्याम - (१९६७ ) आणि आदमी - (१९६८ ) ,
या उलट तीन ही पिक्चर - नायक -राजेंद्र कुमार बरोबर - १. पालकी , २. धरती , आणि शतरंज .. नायिका -बहिदा रेहमान -नायक राजेंद्र कुमार अन -लकी जोडी म्हणूनच लक्षात आहेत.
जुन्या जमान्यातील सस्पेन्स फिल्म मेहल नंतरचा सर्वात यशस्वी सस्पेन्स फिल्म म्हणून ओळखला जाणारा चित्रपट ..बीस साल बाद " या हिट- चित्रपटात वहिदा रेहमानचा नायक होता नवोदित -बंगाली हिरो - विस्वजीत ,.कोहरा आणि मजबूर " असे आणखी २ चित्रपट वहिदा रेहमानने विस्वजीत बरोबर केले
कवी शैलेंद्र निर्मित ."तिसरी कसम " या चित्रपटात तिचा नायक राज कपूर होता ..वेगळ्या धाटणीचा .तिसरी कसम " समीक्षकांनी गौरविला ,पण प्रेक्षकांनी साफ नाकारला ,राज कपूर बरोबर वहिदा रेहमान ..एक दिल और सौ अफसाने या चित्रपटात ही काम केले .
त्या काळात - प्रायोगिक म्हणता येतील असे दोन चित्रपट वाहिदाने सुनील दत्त बरोबर केले .वाहिदाच्या उत्कृष्ट अभिनयाचे कौतुक झाले ..पण रेश्मा और शेरा आणि मुझे जिने दो " हे दोन्ही चित्रपट फारसे चालले नाही ... .एक फुल चार कांटे, मेरी भाभी , दर्पण हे चित्रपट वहिदा रेहमान ने केले यात तिचा नायक सुनील दत्त होता.
पत्थर के सनम ", आदमी , नील कमल - यात तिचा नायक मनोज कुमार होता..
धर्मेंद्र सोबत ..बाजी , मन की आंखे ,असे काही चित्रपट केले .
वाहिदाच्या चतुरस्त्र अभिनयाने तिच्या अभिनित चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणाऱ्या ठरल्या आहेत .. काही उदाहरणे ,,आठवून पहा म्हणजे वहिदा रेहमान अभिनयसंपन्न तारका आहे याची आठवण होईल.
" प्यासा मधील - गुलाबो , कागज के फुल मधली - शांती , काला बाजार मधली- अलका ", चौदहवी का चंद - जमिला , साहिब बीबी और गुलाम मधली - जबा , मुझे जिने दो मधली- चमेली जान ,
" शगुन मधली गीता ", तिसरी कसम मधली - हिराबाई , "पालकी - मेहरू ", नील कमाल - राजकुमारी नीलकमल ,आणि सीता , खामोशी मधली - नर्स राधा , रेश्मा और शेरा -रेश्मा ..
हे चित्रपट आठवा ..या चित्रपटाचे वेगवेगळे कथानक आणि त्यातील नायिकांची विविध व्याक्तीरूप ..हे रोल करतांना ..वहिदा रेहमानच्या अभिनयाची वेगवेगळे पैलू आणि रंग दिसून येतात आणि समर्थ अशा अभिनेत्रीचे दर्शन होते ..आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात वहिदा रेहमानला यश मिळवता आले आहे .
वहिदा रेहमानच्या रोझी आणि नलिनी या गाईड मधल्या भूमिका आणि खामोशी मधली - नर्स -राधा ही भूमिका तिच्या अभिनय कलेचा सर्वोत्तम अविष्कार मानला जातो ,
गाईड मधील भूमिकेबद्दल वहिदा रेहमानला " १९६७ चा फिल्म फेअर सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार प्राप्त झाला."
१९७१ च्या फागुन मध्ये -धर्मेंद्र तिचा नायक होता - या फिल्म मध्ये वहिदा रेहमानने जया भादुरीच्या आईची भूमिका केली .. इथून वहिदा रेहमानची नायिका म्हणून कारकीर्द संपली .
१९७४ पासून वहिदा रेहमानच्या चरित्र -भूमेकातून परिपक्व आणि सयंतशील अभिनयाचे पैलू दिसून आले .. या सर्व भूमिका रसिकांना आवडल्या हे सांगणे न लगे .
१९७६ ते १९८९ या काळातील - कभी कभी , त्रिशूल , नमकीन , नमक हलाल , मशाल , चांदनी ..हे चित्रपट सहज आठवतात .
या नंतरच्या काळातील ..अलीकडचे म्हणता येतील असे .. ओम जय जगदीश - (२००२ ), रंग दे बसंती - (२००६ ), दिल्ली -६ (२००९ ) या चित्रपटातून वहिदा रेहमान यांचे दर्शन झाले आहे.
नृत्य कुशल - वहिदा रेहमानची ही गाणी -
१. मतवाली नार ठुमक ठुमक चली जाए- एक फुल चार कांटे, २. सुनो जी सुनो हमारी भी सुनो- एक दिल और सौ अफसाने , ३- एक दिल और सौ अफसाने -हाय मुहाबत हाय जमाने - शीर्षक गीत,
४- जंगल मी मोर नाचा किसने देखा - शतरंज , ५- आज फिर जिने की तमन्ना , ६- पिया तोसे नैना लागे रे , ७ - सर्प -नृत्य - गाईड , ८- रंगी ला रे - प्रेम पुजारी , ९. धीन क धीन -फागुन आयो रे - फागुन
वहिदा रेहमानवर चित्रित झालेली माझी आवडीची ही काही सदाबहार गाणी ..तुम्ही पण जरूर पहा...- सोलो सॉंग आहेत ही -
१. सच हुये सपने तेरे .. काला बाजार , २. बदले बदले मेरे सरकार नजर आते है ..चौदहवी का चांद , ३. भंवरा बडा नादान है ..साहिब बीबी और गुलाम ,
४ ए मुहबत मेरी दुनिया मी तेरा काम न था - बीस साल बाद , ५, ना तुम हमे जानो - बात एक रात की , ६ - ओ बेकरार दिल- कोहरा , ७. आ आभी जा रात ढल ने लगी - तिसरी कसम,
८. कल के सपने आज भी आना - दिल दिया दर्द लिया , ९, कारे बदरिया म्हारे लेहरिया - आदमी , १०. कोई नही है फिर भी है मुझ्को - पत्थर के सनम , ११, बाता दु क्या लाना - पत्थर के सनम ,
१२. नदी नाले न जाव शाम - मुझे जिने दो , १३, नस नस मी अगन - रेश्मा और शेरा , हे रोम रोम मी बसने वाले राम - नील कमल .
वहिदा रेहमान या आवडत्या अभिनेत्रीला अनेकानेक शुभेच्छा
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----
(आंतरजाल वरील उपलब्ध माहितीच्या आधारे केलेले लेखन )
-अभिनेत्री - वहिदा रेहमान
- अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
------------------------------ -----------------------------