Thursday, February 3, 2022

फिल्म संगीत - -टोकीज - रेडीओ , रेकोर्ड, टिव्ही..वगेरे

फिल्म संगीत टॉकीज,रेडिओ ,रेकॉर्ड ,टीव्ही, वगैरे... --------------------------- रसिक हो नमस्कार.. बोलपट झाल्यावर " हिंदी फिल्म आणि संगीत यांचा प्रवास "रेडिओ, रेकॉर्ड प्लेयर, टॉकीज, व्हीडिओ, टीव्ही, आणि आता अत्याधुनिक इंटरनेट असा झाला आहे.. मित्र हो .. "मै खुश नसीब हूं ..या फिल्मी प्रवासाचा मी हमसफर" आहे.. आयुष्य प्रवासातील सत्तरीच्या वळणावर सफर", करणारा मी एक साधा -"आदमी" आहे. ज्याचे सगळे आयुष्य या हिंदी फिल्म्सनी, त्यातील कलाकार, गायक-गायिका, गीतकार, संगीतकार आणि इतर अनेक गोष्टींनी पुरते झपाटून टाकले आहे. "या पृथ्वीतलावरील माणसांचे अवघे भावविश्व या फिल्म्सनी आणि त्यातील गाण्यांनी व्यापून टाकले आहे.जनसामान्यांच्या आयुष्यात याचे अनन्य साधारण असे भावनिक महत्व आहे. असे म्हणावेसे वाटते. मी देखील यायलाच एक फिल्म वेडा, हिंदी फिल्म संगीताचा "कानसेन" आहे, ज्याच्या मनावर के.एल.सैगल नावाच्या "तानसेन"च्या आवाजाचे गारुड आहे. मित्र हो.. हिंदी फिल्म आणि हिंदी फिल्म संगीत पर्व "म्हणजेच "गोल्डन ईरा" 1950 पासून आहे असे मानले जाते. मी याच "सुवर्ण काळात जन्मलो हा खरेच म्युझिकल सुवर्णयोग आहे कारण माझा जन्म झाला ते वर्ष आहे 1951". मित्र हो, या जगात माझा प्रवेश झाला, त्या क्षणापासून, त्या पहिल्या दिवसापासून " हिंदी फिल्मी गीत आणि संगीत ,माझ्या कानावर पडून थेट "दिल" के पास पोंचले आहे. हिंदी फिल्म म्युझिक " हे मला मिळालेले "बाळकडू", आहे, "आरोग्य वर्धिनी असलेली "बालघुटी"आहे " अशी माझी "भावना"आहे. इंटरनेटवर मी सहज शोधले आणि फिल्म संगीताची "जादू" माझ्या बालमनावर का पडली असेल ? त्याचे उत्तर मिळाले.. 1951 ज्यावर्षी मी जन्मलो..त्यावर्षी रिलीज झालेले काही फिल्म्स--..बद्दल माहिती करून घेऊया त्यासाठी पुढच्या भेटीत बोलू या.. ------------------------------------------ - -अरुण वि.देशपांडे-पुणे 9850177342 ------------------------------------------------