Friday, January 1, 2016

लेख-  ऐ फुलों की रानी..साधना ".
ले- अरुण वि.देशपांडे 
-----------------------------------------------------------

२५ डिसेम्बर -२०१५ -हिंदी फिल्मी-जगतातील  साधना "नावाच्या  सौंदर्य -युगाचा अस्त झाला .आणि
लाखो चाहत्यांना  साधना - युगाची आठवण झाली. आपल्या देखण्या रूपाने  व तितक्याच सुरेख अभिनयाने 
१९६० ते १९७५  या वर्षावर  साधना या नावाची मोहोर उमटलेली  आहे.
भुरळ घालणारे सौंदर्य , घायाळ करणारे दिलखेचक स्मितहास्य ,आणि सरस अभिनय म्हणजे साधना "हे समीकरण 
फिल्मी -रसिकांच्या मनात घर करून आहे.
१९६० साली प्रदर्शित झालेला - लव्ह इन सिमला -साधना आणि जॉय मुखर्जी -या दोघांचा पहिलाच चित्रपट .या  हिट
चित्रपटाने " साधना चा फिल्मी प्रवास सुरु झाला .
रहस्यमय -(सस्पेन्स )-  चित्रपटांची नायिका - साधना -म्हणून तिची ठळक ओळख निर्माण झालेली आहे. तिच्या तीन ही रहस्मय चित्रपटांना अमाप यश मिळाले -
१९६४- "  वह कौन  थी-  नायक होता मनोजकुमार 
१९६५ - अनिता - पुन्हा -  मनोज कुमार  
आणि  १९६६ - मेरा साया  - सुनील दत्त .

 वह कौन थी" मधील  तिच्या  अप्रतिम भूमिकेसाठी ,  साधनाचे त्यावर्षीच्या  " फिल्म फेअर  पुरस्कारासाठी  नामांकन झाले होते . .पण ते तिला मिळाले नाही 
आपल्या फिल्मी कारकिर्दीत साधनाने ४ चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या . १. वह कौन थी, २- मेरा साया , ३- गीता मेरा  नाम ,आणि ४- मेहफिल .या पैकी  गीता मेरा नाम या चित्रपटाची ती डायरेक्टर सुद्धा होती

प्रेमपत्र , परख आणि हम दोनो "मधील भूमिकांनी  साधनाने भारतीय जनमानसात प्रिय असलेलेया "भारतीय स्त्री-रुपातल्या  भूमिका साकारल्या .".असली -नकली ", गबन , मेरा सया -मधील तिच्या सोज्वळ भूमिका लोकप्रिय ठरल्या .
साधना नायिका असलेले सर्वच चित्रपट  संगीतामुळे गाजले - नामवंत संगीतकारांचे संगीत लाभलेले हे चित्रपट आजही 
त्यातील गाण्यांमुळे आणि पडद्यावरील सुंदर साधना मुळे आजही प्रचंड पाप्युलर आहेत.

लतादीदींचा आवाज साधनाच्या अभिनयाला अधिक गहिरा बनवून गेलाय "असे म्हणणे योग्यच ठरावे.
वह कौन थी, मेरा सया ,मन मौजी -या तीनही चित्रपटांचे संगीतकार होते मदन मोहन . लता मंगेशकर यांनी यातील गायलेली गाणी  "सदाबहार नगमे "तर आहेतच पण या सोलो-गीतांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे.
१.जो हमने दास्ता अपनी सुनाई , २.नैना बरसे रिमझिम रिमझिम  ३.लग जा गले से -
साधनाचा अभिनय आणि लतादीदींचा आवाज -बस ऐकत राहावे -पहात राहावे अशी अवीट गोडीची गाणी.

मेरा साया -हा साधनाच्या कारकिर्दीतील  माईल-स्टोन "आहे.-यात तिचा नायक-सुनील दत्त होता .
१.तू जहा जहा चलेगा , २.नैनो मे बदरा छाये ३- नैनो वाली ने  हाय मेरा दिल लुटा - गायिका -लता मंगेशकर 
आणि झुमका गिरा रे "- आशा भोसले ..
मनमौजी -संगीत मदनमोहन ,नायक -किशोरकुमार .यातील साधनाच्या तोंडी असलेली दोन गाणी -गायिका -लताजी.
१.चंदा जा चंदा जा रे जा  आणि २- मै तो तुम संग नैन मिला के हार गयी सजना 
..
शंकर-जयकिशन यांचे संगीत लाभलेले साधनाचे चित्रपट -आणि त्यातील सुमधुर गाणी -रफी आणि लताजी 
असा हा सुरेख आणि सुरेल संगम आहे.
- असली -नकली - देव आनंद , आरझू -राजेंद्र कुमार , आणि शम्मी कपूर -बरोबरचे -तीन चित्रपट 
१.-राज कुमार २. -बदतमिज ,३ सच्चाई ,आणि . गबन -सुनील दत्त  , राजेश खन्ना -दिल दौलत दुनिया .
या सर्व चित्रपटातील गाणी  त्या सोबत साधनाला पहाणे म्हणजे एक अप्रतिम  बघणीय असा अनुभव आहे.
ही गाणी आठवा म्हणजे डोळ्या समोर देखणी साधना उभी रहाते -
तेरा मेरा प्यार अमर , तुझे जीवन की डोर से (असली नकली ), आज आई बहार , तुमने पुकारा और , तुमने किसी की  जान को , इस रंग बदलती दुनिया मे-(राज कुमार ) , अजी रुथ कर . बेदर्दी बालमा तुझको , ऐ फ्हुलो की रानी,
छलके तेरी आंखो से - (आरझू) , मैने देखा था सपनो मे एक चंद्रहार , तुम बिन सजन बरसे नयन ,(गबन) ,
हसीन हो तुम खुदा नाही हो , पेहला पेहला प्यार है ये..(बदत्मीझ ) .

१९६५ च्या वक्त "मधील मीना "च्या भूमेकेसाठी साधनाचे फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामाकन झाले होते .
पहिला मल्टी- स्टारर "म्हणून "वक्त " ओळखला जातो .संगीतकार रवी  यांनी अशा भोसलेच्या आवाजात साधनासाठी मधुर गाणी दिलीत .कौन आया के निगाहो मे, चेहेरे  पे ख़ुशी छा जाती है , हम जब सिमट की आपकी बाहो मे...
संगीतकार रवी यांचे संगीत असलेल्या - एक फुल दो माली -(संजय खान ), अमानत (मनोज कुमार ) आणि वंदना (परीक्षित सहानी ) यातील साधनाची गाणी गाजली.

सरस अभिनय ,सोज्वळ आणि शालीन सौंदर्य ,कसदार भूमिका आणि लोकप्रिय नायिकेचा रसिक-सन्मान " या गोष्टी 
साधनांची कारकीर्द  सोनेरी -लखलखीत  करणाऱ्या ठरल्या.
वरील सर्व गुण-विशेष"  खरे ठरवणारा साधनाचा खास असा तिचाच म्हणवणारा आणखी एक उल्लेखनीय चित्रपट 
"मेरे मेहबूब " , यात ज्युबिलीस्टार-राजेंद्र कुमार तिचा नायक होता. .
साधना आणि मेरे मेहबूब "रसिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव आहे..मेरे मेहबूब तुझे , तेरे प्यार मी दिलदार , मुझे तेरी मुह्बत का , तुमसे इजहार ए हाल कर बैठे , ए हुस्न जरा जाग तुझे .. संगीत -नौशाद , गीत -शकील बदायुनी , गायक -रफी -लता ..मेरे मेहेबुब -म्हणजे साधनाच्या करिअर  मधले संगीतमय सुवर्ण पान -होय.

ओ .पी.नय्यर च्या संगीताने सजलेल्या  एक मुसाफिर एक हसीना -नायक -जॉय मुखर्जी -या म्युझिकल फिल्म ने 
साधनाच्या यशस्वी कारकिर्दीला अधिकच भक्कम बनवले.
१.आप युही अगर हमसे, २.बहोत शुक्रिया बडी मेहेरबानी , ३-हमको तुम्हारे इश्क ने, ४.मुझे देख कर आपका मुस्कुराना ,५- मै  प्यार का राही हु ..अशा आणि रफींच्या गाण्यांनी -पडद्यावरील साधनाला खुलवले आहे.

साधनाने  -दुल्हा -दुल्हन -(राज कपूर ), इश्क पर जोर नही - ( धर्मेंद्र ) ,,शशी कपूर (प्रेमपत्र ) , मेहफिल (अनिल धवन ),अशा  चित्रपटातून भूमिका केल्या.
नायिका प्रधान  आणि नायक-प्रधान चित्रपट अशातून भूमिका करतांना साधनाने आपल्या अभिनयाचे रंग या रोल मध्ये भरले म्हणूनच तिच्या  सगळ्याच भूमिका रसिकांच्या अजून आठवणीत ताज्या आहेत .परख ,असली -नकली ,
मेरेमेह्बुब , हम दोनो , वक्त , इंतेकाम , मेरा साया , वह कौन थी, गीता मेरा नाम  आणि आरझू  हे चित्रपट -म्हणजे साधनाच्या अभिनयाचे विलोभनीय दर्शन घडवणारे आहेत ,सुरेख अभिनय आणि सौंदर्यवती -साधना असा योग रसिकांच्या वाट्यास आलेला आहे.
साधना -रसिकप्रिय अभिनेत्री .जिला पाहून मोहित झालेला रसिक सहज म्हणतो- नैनोवली ने हाय मेरा दिल लुटा ..!
तमाम रसिकांच्या वतीने ही स्मरणांजली  साधनासाठी.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेख- - -- ऐ फुलों की रानी"-साधना "...! 
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे .
मो- ९८५०१७७३४२ 

No comments:

Post a Comment