लेख - ५ वा .. सुहाना सफर गीतोंका - १९५० ते १९६५ -
अरुण वि.देशपांडे .
-------------------------------------------------------------------------------------
रसिक हो -
नमस्कार ,
आपल्या सुरेल स्वर -प्रवासात ..रोज अनेक रसिक मित्र सामील होत आहेत ,या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. या अगोदर मी म्हणलो होतो की - फिल्मी -संगीत लोकप्रिय होणे -यात अनेकांचा सहभाग आहे. त्यापैकी एक महत्वाचा घटक म्हणजे ..गीतकार .
गीत आणि संगीत .हे दोन्ही , हिंदी-चित्रपटांचा अविभाज्य असा भाग बनून राहिला आहे. जुन्या काळातील चित्रपट पाहतांना सहज जाणवते की. या कथानकातून गाणी वजा केली तर ? ही कल्पना करणे सुद्धा कठीण आहे ना...!म्हणून तर शेकडो पिक्चर आज ही केवळ त्यातील गाण्यांसाठी आठवणीत कायम राहिलेले आहेत.
हिंदी-पिक्चर किती प्रकारचे असावेत ? आठवून तर पाहू या - कसे आहेत हे पिक्चर ..?
स्टंट-पिक्चर -म्हणजेच -हाणामारीचे ,आणि जादुई पिक्चर , पौराणिक , ऐतिहासिक , रहस्यमय आणि सस्पेन्स -थ्रिलर , करमणूक -प्रधान -यालाच "पलायनवादी चित्रपट" असे म्हटले जाते , समाजिक जाणीव आणि समस्या घेऊन त्यावर प्रबोधन करणारे ,भाष्य करणारे , असे सामजिक चित्रपट . ढोबळमनाने अशी ही
वर्गवारी करता येते.
आपल्या हिंदी -चित्रपटांना - "हिंदुस्थानी " असेही म्हटले जाते . यात उर्दू आणि हिंदी -या दोन्ही भाषांचा वापार केला जातो .त्यामुळे निखळ हिंदी आणि नफीस -उर्दू .या दोन्हीचा अप्रतिम असा संयोग आपल्या फिल्मी गाण्यात झालेला आहे असे म्हणू शकतो.
वर्गवारी कोणतीही असो.. या सगळ्या पिक्चर मधली गाणी ..त्यात असणे हीच या चित्रपटांची आठवण आहे.
कथानकातील प्रसंगानुसार गाणी -सिच्युएश्नल -सॉंग" असे या गाण्यांबद्दल म्हणता येईल. त्या प्रमाणे या गाण्यावर मोठी जबाबदारी असे -ती म्हणजे "ही फिल्म -गाण्यांच्या जोरावर पुढे पुढे नेणे ", आणि आपल्या फिल्मी -गीतकारांनी ही कठीण अशी जबाबदारी लीलया पार पाडलेली आहे.
साहित्य -काव्य रसाचा परिपोष " या गीतांमधून आपल्याला अनुभवता आलेला आहे. कारण ही गीत लिहिणारे गीतकार -, कवी -आणि शायर होते ..त्यामुळे तरल काव्यानुभूती आणि शेरो -शायरीची खुमारी ,या गाण्यातून आपण रसिक अनुभवत आलेलो आहोत.
आघाडीचे गीतकार म्हणून- राजेंद्र कृष्ण , शैलेंद्र -हसरत , मजरूह , शकील बदायुनी , साहीर लुधियानवी यांचा उल्लेख करतांना , यांच्या सोबतीने तितक्याच ताकदीच्या रचना करणाऱ्या गीतकार आणि शायर यांच्या
फिल्मी-दुनियेतील गौरवपूर्ण कामगिरीचा आपण मागोवा घेणार आहोत ..
पुढच्या लेखात आपण ..पं. भारत व्यास या गीतकाराची आठवण जागवू या.
रसिकांनी या अगोदरचे लेख जरूर वाचावेत आणि ही सफर कशी चालली आहे ,हे जरूर सांगावे.
आपला -
अरुण वि.देशपांडे - पुणे .
संपर्क -
मो- ९८५०१७७३४२
Email -
arunvdeshpande@gmail.com

No comments:
Post a Comment