लेख- ४ था - सुहाना सफर -गीतोंका - १९५० ते १९६५...!
अरुण वि.देशपांडे .
मो- ९८५०१७७३४२
------------------------------------------------------------------------------
रसिक हो ,
गेल्या ३ लेखातून आपण फिल्मी-संगीत आणि फिल्मी गीतांच्या संदर्भातल्या आठवणी जागवत आहोत. हे करीत असतांना आपले मन नकळत त्या मखमली आठवणीत अलगद गुरफटून जाते आहे,किती छान वाटते ते , शब्दात सांगण्यापेक्षा ,मनाने अनुभवणे जास्त चांगले आहे.असे तुम्ही नक्कीच म्हणाल.
फिल्मी गीत आणि त्याचे संगीत -हे एका व्यक्तीचे वा एकट्याचे कार्य आहे आणि नाही ..!हे असे या साठी म्हणतोय की ,संगीतकार कितीही छान संगीतरचना करो किंवा गीतकार कितीही चांगले गीतलेखन करो,ते प्रभावी तेव्न्हाच होते.ज्यावेळी ते तितक्याच ताकदीच्या आवजात गायिले जाऊन.आपल्या पर्यंत येते, मनात शिरते आणि तिथेच राहून वर्षा -नु -वर्षे हृदयात झिरपत राहते.
संगीतकार-गीतकार आणि गायक /गायिका, सहगायक -सहगायिका आणि स्वर-सोबत करणारे कोरसमधले साथीदार.
या सर्वांच्या कामगिरीतून ,कारागिरीतून ..गीत जन्मास येते ,आकारास येते .मग सुरेल असा स्वर-संयोग होतो त्यावेळी अवीट गोडीचे गीत होते.यासाठी गीतकार -संगीतकार आणि गायक-कलाकार या सर्वांचे सारखेच आणि महत्वाचे योगदान असते असे मला वाटत आले आहे.
फिल्म-संगीत हे जास्त केव्न्हां पासून लोकप्रिय झाले ? याचे उत्तर ..ज्या वेळे पासून गायक-गायिकांचा उसना आवाज घेऊन.स्क्रीनवरील कलाकार गाण्यावर अभिनय करू लागले.तेव्न्हा पासून गाण्याची खुमारी वाढली, रंगत वाढली ,गाणी श्रवणीय होती ती अधिक "बघणीय "झाली.
सुरेंद्र , नूरजहाँ,करण दिवाण , सुरैय्या , उमादेवी ,के.एल सैगल , हे सगळे गायक-अभिनेते आणि अभिनेत्री होते.
जुन्या जमान्यातील -
खुर्शीद ,,,राजकुमारी , अमिरीबाई कर्नाटकी , जोहराबाई अम्बालावाली , सुलोचना कदम (चव्हाण ), शमशाद बेगम याचे आवाज कसे विसरता येतील ?
आणि -लता मंगेशकर ,आशा भोसले , सुमन कल्याणपूर , उषा मंगेशकर ,गीता दत्त ,मुबारक बेगम , कमल बारोट सुधा मल्होत्रा , ,कृष्णा कल्ले , यांनी गायिलेली गीत नेहमीसाठी तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात हमेशा जवान गीत "बनून राहिली आहेत.
ज्यांनी गाण्याची गोडी लावली ते. -कुंदनलाल सैगल , पंकज मलिक ,के.सी.डे,आणि नंतरचे ,
महमद रफी ,मुकेश ,किशोर कुमार ,तलत मेहमूद , मन्ना डे, हेमंत कुमार ,महेंद्र कपूर , चितळकर , सुबीर सेन सी.एच .आत्मा , , आणि अनेक ..कलाकार
या सर्वांच्या आवाजातील गाण्यांनी रसिकांना तृप्त केले आहे.
फिल्मी संगीत म्हटले की - ते पडद्यावर पाहण्या पेक्षा -ते ऐकण्यात आनंद घेणारे रसिक जास्त आहेत ,कारण ही भाव-गीत आहेत, आपल्या मनाला, भावनाना स्पर्श करणारी ही सारी गाणी आहेत.आपला .जसा मूड- तसे गाणे.लावायचे-ऐकायचे त्यात स्वतःला विसरून जायचे ..हे गेले कित्येक वर्षे चालू आहे..या पुढे ही तसेच चालू राहणार यात शंकाच नाही.
रसिक हो -
गीतकार-संगीतकार -गायक ..यांच्या बद्दल आणखी बरेच काही ..पुढच्या वेळी...
भेटू या पुन्हा लवकरच.
तुमच्या प्रतिक्रिया कळवा
या ई-मेल वर-
arunvdeshpande@gmail.com
mob. 9850177342 .
तुमचा दोस्त.
अरुण वि.देशपांडे -पुणे.

No comments:
Post a Comment