रसिक मित्र हो.
नमस्कार ..
हिंदी फिल्मी गाण्यांनी अनेक पिढ्यांना भावगीतांचा आनंद दिला आहे. आपल्या भावनिक जीवनात या गाण्यांना फार मोठे असे भावनिक स्थान आहे. आपल्या मनातील भावनांचे जणू प्रतिबिंबच या गीतातून आपल्याला दिसून येते ,सहाजिकच ही गाणी आपल्या जिवलग सोबत्यांसारखी साथसंगत करीत आलेली आहेत,
हिंदी फिल्मी-संगीत या विषयावर अगदी मनातून-मनापासून भरभरून बोलणारे अनेक रसिक आपल्या सभोवताली आहेत असे जाणवते . या फिल्मी-संगीताच्या " १९५० ते १९६० -या दशकास "फिल्म-संगीताचे
सुवर्ण- युग असे म्हटले जाते..या काळाची मोहिनी रसिकांच्या मनामनावर अजून ही "स्वरांचे गारुड : करून आहे. या काळातील गीतांना - सदाबहार नगमे ,गाणे-सुहाने , मेरी-पसंद , हमेशा जवा गीत " अशा किती तरी
लाडक्या पदव्यांनी गौरविले जाते .
माझ्या मते- फिल्मी गीतांचे -हे "सुर्वण-युग -१९५० ते १९६५ .अशा पंधरा वर्षाच्या कालावधीचे आहे .याचे एक कारण असे ही आहे की-
या अवधीतील - फिल्मी-गीतांचा आस्वाद घेतल्यास फिल्म- संगीत -हे या दीड -दशकातच खऱ्या अर्थाने "लोकप्रिय होते.
हिंदी -चित्रपटांची वर्गवारी -भले ही - ए-ग्रेड , बी-ग्रेड, सी-ग्रेड .अशी केली जात असली तरी .या सर्व ग्रेड मधल्या हिंदी-चित्रपटातील गीतांनी ..आपला स्वतंत्र असा ठसा ,एक स्थान रसिकांच्या मनात निर्माण केले आहे या विषयी काही दुमत असण्याचे कारण नाही.
रसिक हो- या काळातील संगीतकार -आपापल्या परीने उत्तम ते देण्याचा प्रयत्न करीत .त्यांच्यात स्पर्धा असेलही , पण- त्यात "तुझ्या पेक्षा माझेच संगीत श्रेष्ठ हा भाव त्यात नव्हता ". मेलोडियस - म्युझिक ", हा
या संगीताचा विशेष -गुण होता ,असे मला नेहमीच वाटत आले आहे.
-अनिल बिस्वास ,एस.डी. बर्मन , शंकर -जयकिशन , सी.रामचंद्र , खय्याम , मदनमोहन , रोशन , हेमंतकुमार, नौशाद ,रवी ,राहुल देव बर्मन ,गुलाम महमंद , इक्बाल कुरेशी ,
चित्रगुप्त , वसंत देसाई , ओ.पी.नय्यर , कल्याणजी -आनंदजी , लक्ष्मीकांत -प्यारेलाल , ,उषा खन्ना ,सरदार मलिक , हंसराज बहेल , एस.एन.त्रिपाठी ..आणि अनेक गुणी संगीतकार . या सर्वांचा अमीट आणि अवीट असा प्रभाव ..१९५० ते १९६५ - या काळातील फिल्मी-संगीतावर आहे.
संगीतकार कितीही मधुर धून करीत असले तरी .गीत प्रभावी होण्यासाठी ते गीत ही तेव्हढेच - अर्थपूर्ण ,भावपूर्ण असावे लागते .ही गीत लिहिणारी कवी मंडळी - फक्त फिल्मी -गीतकार नव्हते , तर "नामांकित शायर होते ", सभा-संमेलने गाजवणारे कवी-आणि शायर -फिल्मी -दुनियेत आले, आणि त्यांनी आपल्या एक्से एक -रचना पेश केल्या .आणि मग ही "अजरामर -अशी फिल्मी -गीतं झाली.
राजेंद्रकृष्ण , साहीर , शकील बदायुनी , कैफी आजमी , जान निसार अख्तर ,राजा मेहदीआली खान ,हसरत जयपुरी , मजरूह सुलतानपुरी , शैलेंद्र , इंदिवर, कमर जलालाबादी , आनंद बक्षी , फारुख कैसर , असद भोपाली , अंजान, .आणि इतर अनेक कवी- शायर या काळात फिल्मी-गाणी करीत होती.
मित्रांनो -आज पासून -या ठिकाणी आपण नियमितपणे भेटणार आहोत. हिंदी-चित्रपट संगीत "हा माझ्या
जिव्हाळ्याचा विषय आहे. तितकाच तो तुमच्या आवडीचा आहे.
ह्या लेखन -उपक्रमाविषयी तुमच्या शुभेच्छा हव्या आहेत.
या मेल आय.डी वर जरूर द्याव्यात.
arunvdeshpande@gmail.com
माझा संपर्क नं.
मो- ९८५०१७७३४२ .
आपला -
फिल्लम -दिवाना ...
-अरुण वि.देशपांडे -पुणे

No comments:
Post a Comment